प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी , ‘चित्रपतंग समुह’ ही मराठी तरुणांची संस्था कलाप्रसारासाठी २०१२ पासुन कार्यरत आहे.
भारतातील वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या भिन्न संस्कारी मनांमध्ये कलेबाबत सामायिक दृष्टीकोन यावा व प्रत्येकाची सांस्कृतिक विविधता वाढावी, जपावी. म्हणून शालेय विद्यार्थ्यांना कलेचा इतिहास, रसग्रहणाच्या माध्यमातून शुद्ध कल्पनाशक्तीचा विकास आणि वापर करण्याची संधी उपलब्ध करणे तसेच विविध प्रयोगाद्वारे अभिव्यक्त होण्याचे मार्ग शोधत राहण्याचे कार्य होते.
मुक्त – सहज शिक्षण पद्धतीचा अवलंब, तसेच भारतासारख्या कारागिरी संपन्न देशात शास्त्रशुध्द कलाशिक्षण अल्पदरात – सर्वदूर व्हावे असे सुप्त उद्देश ठेवून , प्रत्येकाच्या जगण्यात कला यावी त्यातून समाजमनाची निरागसता आणि आनंद टिकावा ह्या उद्देशाने या समूहाची वाटचाल चालू आहे.
या अंतर्गत पाच उपसंस्था कार्यरत आहेत.

१. चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था (CSKS)
२. चित्रपतंग कला कार्यशाळा ( CKK )
३. चित्रपतंग प्रकाशन ( CPUB )
४. चित्रपतंग कलावृत्त ( CKW )
५. चित्रपतंग अफोर्डेबल पेंटिंग ( CAP )

सह – भागीदार, सहकारी आणि सेवार्थी :

CO-PARTNER

Translate »