चित्रपतंग अफोर्डेबल पेंटिंग

आपल्या घरातील भिंतींवर चित्र आहे का ? नसेल तर,त्याचे कारण ‘चित्रांच्या अनपेक्षित किंमती आहेत का ?
चित्रे आवडतात – पण महाग असतात , असे असेल तर हा चित्रपतंगचा हा विभाग तुम्हला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो . आपण आपल्यासाठी तसेच आपल्या प्रिय व्यक्तींसाठी एक कलात्मक भेट देवू शकता .
इतकेच नाही तर …
लहान मुलांसाठी , हौशी तसेच व्यावसायिक कला विद्यार्थ्यांसाठी – चित्रकारांसाठी वेगवेगळे विभाग आहेत . ज्यात स्वत: काढलेले चित्र वा प्रतिमा इथे विक्रीसाठी देवू शकता . त्यासाठी तुम्हाला चित्रकार असायलाच पाहिजे अशी अट नाही . आपल्याला चांगली वाटते अशी कुठलीही कलाकृती इथे द्या . फायलीमधील ही चित्रे वर्षानुवर्ष त्या कोणालाच दिसत नाही … अशा निवडक चित्रे विक्रीसाठी या दृश्यकला दालनात तुम्ही देवू शकता .
अट एकच सर्व अमुल्य चित्रांच्या किमती मध्यमवर्गाला परवडतील अशा असाव्यात . ( किंमत ५०० ते ५,००० रुपये दरम्यान* )

इथून चित्र विकत घेतल्यास तुम्ही आमच्यासोबत कलाप्रसाराच्या कार्यात आपोआप सहभागी होता . महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना कलाशिक्षण देण्याचे काम चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था करीत असते . त्यासाठी चित्र किमतीतील ६०% भाग हा चित्रकाराला तर उर्वरित ४०% भाग चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था या सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून दिला जाईल.
घरपोच सेवा खर्च अतिरिक्त .

  • ARTISAN GALLERY
  • AMATURE GALLERY
  • ARTIST GALLERY
  • ART STUDENT GALLERY

CO-PARTNER