चित्रपतंग प्रकाशन..

कलेबद्दलची , कलाशिक्षणाबद्दल बऱ्याच गोष्टी संगणकावर असतात पण संगणक प्रत्येक ठिकाणी असतोच असे नाही . म्हणूनच ‘चित्रपतंग प्रकाशन’ हा कलाविषयक पुस्तके प्रकाशित करण्यासाठी विभाग बनवला . कला शिक्षणातील जुनाट परंपरांना छेद देत , पुस्तके केवळ वाचनासाठी न राहता मुलांना विचार व कृतीशील अनुभव मिळावा अशी पुस्तकमालिका तयार केली – करीत आहोत . सरतेशेवटी बालवाचकाला त्या पुस्तकाचा नायकच आहोत वाटावे अशा स्वरूपाने पुस्तक निर्मिती करण्याचा मानस आहे . तसेच विविध क्षेत्रातील , स्तरातील , वयातील लोकांना कलेबद्दलची भाषाज्ञान , माहिती सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न असतो . पुढची पिढी नेहमीच नवा विचारांच्या शोधात असते त्या विचारामागची निर्मिती समजून घेणे हे आपल्याला अभ्यासाइतकेच महत्वाचे आहे . वर्तमानातील जगण्यात प्रयोग करून यशस्वी भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या अशा वाचकांसाठी ‘चित्रपतंग प्रकाशन’ नेहमीच कार्यरत आहे .

 

CO-PARTNER