श्रीनिवास आगवणे

हे शिक्षणाने चित्रकलेतील पदवीधर ( मुंबई विद्यापीठ , सर ज. जि. कला महाविद्यालय )  असून व्यवसायाने मार्गदर्शक , व्यावसायिक ,  संकल्पनात्मक चित्रकार आहेत .चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था – संस्थापक – अध्यक्ष , ‘चित्रपतंग कला कार्यशाळा’चे सहसंस्थापक , चित्रपतंग कलावृत्त चे कार्यकारी संपादक , चित्रपतंग प्रकाशन चे मालक , डॉ . शांताराम कारंडे मित्र संस्थेतील कला विभागप्रमुख म्हणून काम पाहातात.


प्राची श्री. आगवणे

प्राची श्री. आगवणे ह्या शिक्षणाने समाजशास्त्राच्या पदवीधर , चित्रकला आणि अंतर्गत सजावट अभ्यासक्रमाचे प्राथमिक शिक्षण घेतले असून व्यवसायाने लोकनृत्य कलाकार आणि मार्गदर्शक म्हणून काम पाहातात . चित्रपतंग कलावृत्त वर्तमानपत्राच्या संपादिका , चित्रपतंग कला कार्यशाळेच्या सह – संस्थापक , चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेच्या मूळ – सदस्य म्हणून काम करतात .

अश्विनी श. आगवणे

अश्विनी श. आगवणे ह्या शिक्षणाने ‘वस्त्रकला’ विषयात पदवीधर आहेत . निवडक वस्त्रनिर्मिती तसेच कलावस्तू निर्मितीचा त्या व्यवसाय करतात . चित्रपतंग कला कार्यशाळेच्या सहसंस्थापक , चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेत मूळ सदस्य तसेच चित्रपतंग प्रकाशन आणि कलावृत्तच्या वितरण प्रमुख आहेत.

कामिनी श. आगवणे

कामिनी श. आगवणे ह्या आर्थिक व्यवस्थापनाची उच्च पदवीधारक आहेत . खाजगी कंपनीमध्ये त्या कार्यरत आहेत . चित्रपतंग अफोर्डेबल पेंटिंग ( परवडणारी चित्रे ) विभागाच्या प्रमुख , चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेच्या कोषाध्यक्ष , चित्रपतंग कलावृत्तसाठी जाहिरातविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

सतीश बा.भोईटे

सतीश बा.भोईटे हे शिक्षणाने वाणिज्य शाखेतील पदवीधर असून व्यवसायाने व्यावसायिक शोभेच्या वस्तू निर्माते आहेत . चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेत सचिव ( २०१५ – १७ ) तसेच चित्रपतंग कलावृत्तचे निर्मितीप्रमुख आहेत.

कुणाल गोगरकर

कुणाल गोगरकर यांनी सिनेमा निर्मितीचे प्राथमिक शिक्षण घेतले असून ते व्यावसायिक छायाचित्रकार तसेच सिनेमासाठी म्हणून स्वतंत्र कॅमेरामन म्हणून कार्यरत आहेत.चित्रपतंग कला कार्यशाळेत मार्गदर्शक तसेच चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेत उपाध्यक्ष ( २०१५ – १७ ) म्हणून कार्यरत आहेत.

तुषार र. कारंडे

तुषार र. कारंडे हे शिक्षणाने वाणिज्य शाखेतील पदवीधर व फुटवेअर डीझाईनर आहेत . खाजगी कंपनीमध्ये व्हिजुअल मर्चंडायझर म्हणून कार्यरत आहेत.चित्रपतंग कलावृत्त विभागाचे निर्मिती सहाय्यक तसेच चित्रपतंग शैक्षणिक कला संस्थेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

CO-PARTNER